हिंगणगाव हे गाव तालुक्याच्या ठिकाणा सुमारे ४ किलोमीटर अंतरावर वसले आहे. गावाच्या जवळच धामणगाव रेल्वे हे नगरी असली तरी गावाने आपली ओळख कायम ठेवली आहे. गावाच्या विकासामध्ये भौगोलिक परिस्थितीचा सिंहाचा वाटा असून येथील ७०% लोकांचा मुख्य व्यवसाय शेती आहे. तसेच प्रमुख पिके,कापूस तूर,सोयाबीन,चना, इ. असले तरी सोयाबीन हे पिक गावाच्या विकासाचा कणा आहे. आणि जवळच धामणगाव रेल्वे नागरी व महत्वाचे रेल्वे स्टेशन असल्यामुळे गावाची नागरी विकासाकडे वाटचाल होत असल्याचे दिसून येते.
##
एकात्मिक आणि सर्वसमावेशक गावाचा विकास करणे ज्यामध्ये उत्तम आरोग्य, दर्जेदार शिक्षण, स्वच्छता, शुद्ध पाणीपुरवठा, मजबूत पायाभूत सुविधा पर्यावरणाचे संवर्धन, महिलांचे सक्षमीकरण, युवकांना नवीन संधी उपलब्ध, आणि प्रत्येक नागरिकाला सन्मानाने जीवन जगण्याची समान संधी मिळेल. यामध्ये गावातील वंचित घटकांना प्राधान्य देऊन त्यांना मदत करून “स्वच्छ, सुंदर, समृद्ध आणि आत्मनिर्भर" ग्राम निर्माण करणे.
हिंगणगाव ग्रामपंचायतची स्थापना सन 19५१ मध्ये झाली आहे. पहिले सरपंच श्री.रामप्रतापसिंह रा. ठाकुर होऊन गेले आहे. परसोडी हे गाव व त्यालगत असलेले १६ पेक्षा जास्त नगरांचा ग्रामपंचायत मध्ये समाविष्ट झाल्यामुळे हिंगणगाव ग्रामपंचायतचा खूप मोठा विस्तार झाल्याचे दिसून येते. ग्रामपंचायतचे घोषवाक्य “गावाचा विकास देशाचा विकास” हे असून ग्रामपंचायत गावांमध्ये पायाभूत सुविधा पुरविण्यात सदैव प्रयत्नशील आहे. हागणदारी मुक्त गाव,तंटामुक्त गाव,डिजीटल गाव, अशा विविध प्रकारच्या योजना/कार्यक्रम/उपक्रम राबवून गावाचा विकास साधण्यात ग्रामपंचायतने प्रयत्न केले आहे. हिंगणगाव ग्रामपंचायत हि विकासात्मक दृष्टीकोण ठेवून गावाच्या विकासाच्या चळवळीत सदैव कार्यरत आहे. तसेच गावाचा सर्वांगीण विकास करणे हे ग्रामपंचायतचे मुख्य उद्देश आहे. गावाचा विकास करून ग्रामपंचायतचे नाव इतिहासाच्या सोनेरी पटावर नोंदविण्यात रत्यनशील आहे.
ग्रामातील प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पाणी, स्वच्छता, आरोग्य आणि शिक्षण इ. मूलभूत सोयी पुरवणे. तसेच शासनाच्या सर्व योजना पारदर्शकपणे राबवून सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवणे. ग्रामातील युवकांना रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे. महिला सक्षमीकरण, पर्यावरण संवर्धन आणि हरितग्राम असे उपक्रम राबवून ग्रामांचा विकास करणे. ग्रामपंचायतीचे प्रशासन डिजिटल पद्धतीने सक्षम करून लोकभिमुख करणे.
पारदर्शकता :
ग्रामपंचायतीच्या सर्व कामांमध्ये पारदर्शकता आणून
“डिजिटल ग्रामपंचायत” सारख्या उपक्रमातून लोकाभिमुख करणे.
लोकसहभाग :
ग्रामसभेच्या माध्यमातून सार्वजनिक निर्णय आणि प्रक्रियेमध्ये
जनतेचा सक्रिय सहभाग घेणे, ज्यामध्ये लोकांचे विचार, गरजा
आणि मूल्ये इ. अधीन राहून गावाचा विकास करणे.
जबाबदारी :
ग्रामपंचायतीच्या निर्णय, कृती, कार्य इ. ची योग्य प्रकारे
अंमलबजावणी करून गावाच्या विकासाला गती देणे.
समानता :
नागरिकांना समान संधी व न्यायिक अधिकार देणे तसेच
वंश, धर्म, लिंग किंवा इतर कोणत्याही कारणास्तव
कोणताही भेदभाव न करणे.
स्वच्छता व पर्यावरण संवर्धन :
नैसर्गिक संसाधनांचा योग्य उपयोग करून पर्यावरणाचे
संतुलन राखणे व स्वच्छ व हरित ग्राम निर्माण करणे.
प्रामाणिकपणा :
प्रत्येक कार्यात प्रामाणिकपणा, नीतीमत्ता आणि
सार्वजनिक हिताची भावना जपणे.
नवीन उपक्रम व नावीन्य :
आरोग्य, शिक्षण, शेती, स्वच्छता व सामाजिक-आर्थिक
बाबींचा विचार करून उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर
करून गावाच्या विकासाला गती देणे.
सेवाभाव :
नागरिकांप्रती प्रेम, सहानुभूती, सहवेदना व
एकात्मतेची भावना ठेवून निःस्वार्थपणे कार्य
करून लोकाभिमुख सेवा पुरवणे.